नेवरगाव – सुरेगाव जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला गती

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) :  तालुक्यातील नेवरगाव ते नेवासा तालुक्यातील सुरेगाव याना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाला अखेर वेग आला आहे. गंगापूर व नेवासा तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे दिसत आहे.

या पुलासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यानी सातत्याने पाठपुरावा केला. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न करून संबंधित खात्यांकडून मंजुरी मिळवून देण्यात आली.

प्रारंभी काही तात्रिक वप्रशासकीय अडचणीमुळे कामात विलंब झाला होता। मात्र मार्च २०२६ पासून कामाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. श्रीक्षेत्र सकटेश्वर मंदिर देवस्थान परिसरात या सुरुवात पुलाच्या कामाची करण्यात आली असून नुकताच मिक्सर मशीन प्लाट व होल बोरिंग मशीनच्या कार्याचा शुभारंभकरण्यात आला. यावेळी मशिनरीचे पूजन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी अनंतगिरी महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज शिंदे, ठेकेदार डी. बी. जगताप, पंचायत समिती सदस्या कांताताई गायकवाड, प्रविण वालतुरे, दत्तात्रय पवार, अशोक सूर्यवंशी, दादासाहेब वालतुरे, राधाकिसन वावरे, बद्रीनाथ तागड आदी मान्यवर उपस्थित होते.

नेवरगाव हैबतपूर येथील नागरिकांच्या वतीने उद्धव महाराज मंडलिक व ठेकेदार डी. बी. जगताप यांचा सत्कार करण्यात आला. हा पूल पूर्ण झाल्यानंतर सुमारे ४० किलोमीटरचे अतर कमी होणार असून वैजापूर, टोवला,

कन्नड, गंगापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकाना मोठा फायदा होणार आहे. नेवासा येथील देवस्थानाकडे जाणाऱ्या पायी दिंड्या तसेचपंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासाचे अंतरही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा पूल वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

सध्या पुलाच्या कामाला वेग आल्यामुळे गंगापूर वनेवासा तालुक्यातील नागरिकामध्ये समाधानाचे वातावरण असून हा पूल लवकरात लवकर पूर्णव्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.